About Company
भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेडसगांव
वारणा नदी काठचा ग्रामीण भाग व परिसरातील गोरगरीब, कष्टकरी व छोटे मोठे धंदेवाल्या जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने श्री. हंबीरराव केशवराव पाटील (बापू) यांनी दि. २८ ऑक्टोबर १९८८ रोजी ‘भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्थे’ची भेडसगांव, ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर याठिकाणी स्थापना केली. अवघ्या एक टेबल व खुर्ची पासून सुरू झालेला हा तीन दशकांचा प्रवास आज १८ अद्ययावत शाखांपर्यंत पोहचला आहे. भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रमुख उद्देश हा कार्यक्षेत्रातील सभासदांना विविध पत सेवा देणे तसेच सभासदांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी मदत करणे हा आहे. भेडसगांव नागरी पतसंस्थेच्या सहकारातील प्रगतीचा सन्मान करत सहकार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पत संस्थेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मंजूर केले आहे. सहकार शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘सहकाराचा मानबिंदू’ म्हणून पत संस्थेस गौरविले आहे.
Safe Investments
The Better Way To
Save & Invest
भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेडसगांव अधिक ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते आणि त्यांना सहजतेने बचत आणि गुंतवणूक करण्यात मदत करते. सन १९८८ पासून भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे.
Why People Choose Us
भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेडसगांव
Need a Personalized
Solution?
Get in touch with us, and we will help you to create the right solution for your business or personal needs.