Skip to content

भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाबत

संस्थापक चेअरमनमा.सभापती बांधकाम व आरोग्य समिती (जि.प.कोल्हापूर)

मा.श्री. हंबीरराव केशवराव पाटील (बापू)

संस्थापक चेअरमन
मा.सभापती बांधकाम व आरोग्य समिती (जि.प.कोल्हापूर)

वारणा नदी काठचा ग्रामीण भाग व परिसरातील गोरगरीब, कष्टकरी व छोटे मोठे धंदेवाल्या जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मा. श्री. हंबीरराव केशवराव पाटील (बापू) यांनी दि. २८ ऑक्टोबर १९८८ रोजी ‘भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्थे’ची भेडसगांव, ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर या ठिकाणी स्थापना केली. मा. श्री. हंबीरराव केशवराव पाटील (बापू) गेली अनेक वर्षे सहकार, सामाजिक व राजकीय जीवनात कार्यरत आहेत. सन १९९७ साली मा. हंबीरराव पाटील (बापू) यांचा भेडसगांव ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय जीवनास प्रारंभ झाला. सन २००० साली विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चिखली या ठिकाणी त्यांना संचालकपदाची संधी मिळाली व आजतागायत सदर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सन २००० साली भेडसगांव पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन पहिल्याच प्रयत्नात उपसभापती झाले. सन २००७ ते २०२२ या काळात त्यांनी जि. प. कोल्हापूर सदस्य म्हणून सरुड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याच काळात जि.प. बांधकाम व आरोग्य समिती सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. खासकरून करोना महासाथीच्या काळात आरोग्य सभापती म्हणून त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा उल्लेख आजही केला जातो. मा. हंबीरराव पाटील (बापू) यांच्या कुशल नेतृत्वाखाली ‘भेडसगांव नागरी सहकारी पत संस्थे’ची स्थापनेपासून यशस्वी घोडदौड चालू आहे. अवघ्या एक टेबल व खुर्ची पासून सुरू झालेला हा तीन दशकांचा प्रवास आज १८ अद्ययावत शाखांपर्यंत पोहचला आहे. भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रमुख उद्देश हा कार्यक्षेत्रातील सभासदांना विविध पत सेवा देणे तसेच सभासदांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी मदत करणे हा आहे.

भेडसगांव नागरी पतसंस्थेच्या सहकारातील प्रगतीचा सन्मान करत सहकार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पत संस्थेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मंजूर केले आहे. सहकार शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘सहकाराचा मानबिंदू’ म्हणून पत संस्थेस गौरविले आहे. ‘भेडसगांव नागरी’स बँको पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सहकार व आधुनिकता यांची योग्य सांगड घालत भेडसगांव नागरी पत संस्थेने Core banking प्रणाली, SMS Banking, RTGS/NEFT या सुविधा सुरू केल्या आहेत. ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याच्या उद्देशाने संस्थेने महावितरण विद्युत देयक भरणा (MSEB Bill Payment) करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 

Translate »