मुदत ठेव
आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ग्राहक आमच्या विविध मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता, आकर्षक व्याजदर ही या योजनांची वैशिष्ट्ये आहेत. आपल्या कडील अतिरिक्त रक्कम नाहक खर्च होऊ नये यासाठी ती रक्कम आकर्षक व्याजदराच्या मुदत ठेवीत गुंतवणे हा एक उत्तम उपाय आहे.