रिकरिंग ठेव (RD)
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे थोड्या थोड्या बचतीतून मोठा परतावा मिळवण्याची संधी रिकरिंग ठेव योजनेत मिळते. या योजनेंतर्गत काही ठराविक कालावधीसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवा व या कालावधीनंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील आकर्षक व्याज अशी एकत्रित रक्कम मिळेल. दर महिन्याला आपल्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गुंतवण्याची संधी रिकरिंग ठेव योजनेत मिळते.