बचत खाते
ग्राहकांना काटकसर करण्यास प्रोत्साहन मिळावे तसेच आपल्या उत्पन्नातील काही भागाची बचत करण्याची सवय जडावी, हा बचत खाते उघडण्यामागील मुख्य हेतु असतो. बचत खात्याद्वारे आपल्या पैशाची सुरक्षितता, खात्यातील रकमेवर व्याज, कोणत्याही क्षणी रकमेची उपलब्धता हे उद्देश साध्य होतात.